Sunday, July 19, 2009

नातं


नातं


नातं हे काय असतं !
नातं हे रक्ताचं असतं !!
आई-मुलांचं प्रेम असतं !!!


नातं हे काय असतं !
नातं हे विचारांचं असतं !!
गुरु-शिष्यांचं बंधन असतं !!!


नातं हे काय असतं !
नातं हे मनाचं असतं !!
दोन जीवांचं मीलन असतं !!!


नातं हे काय असतं !
नातं हे विज्ञान असतं !!

पशु-पक्ष्यांचं जीवन असतं !!!


नातं हे वाळुप्रमाणं असतं !
घेता गच्च मुठीत !!
जाईल निसटुन क्षणात !!!


नातं हे पतंगाप्रमाणं असतं !
असेल ताण जास्त !!
कटन्याची फारच धास्त !!!


नातं हे काय असतं !
नातं हे चूंबक नसतं !!
समविचारांचं अपकर्षण नसतं !!!


नातं हे काय असतं !
प्रेमाचं प्रमाण असतं !!
आयुष्याचं समीकरण असतं !
जगन्याचं कारण असतं !!


नातं हे काय असतं !
नातं हे नातं असतं !!
माझ्यासाठी ते एक प्रश्नचिन्ह (?) असतं !!!




(composed before 19 July 09)

5 comments:

  1. are tu kadi pasun lihito itkya bhari kavita???
    mast ahe hi kavita pan..reallly nice 1..liked it very much...i think we should publish ur 1 book of poems...
    keep it up dude..

    ReplyDelete
  2. vaa..far sundar kavita kelis..
    i really liked it..
    Pravin..The Poet...
    Good Luck..

    ReplyDelete
  3. kavita????????? chan ahe......... keep it up.

    ReplyDelete
  4. 1 number cocks keep it up!!!!!!!!

    ReplyDelete
  5. Hey,may i know who are Abi and Sachin?
    I mean i am not able to find their profiles anywhere..

    ReplyDelete