
विषाद
ठरवलं आज तुझ्यावर रागावायचं !
ठरवलं आज नाही बोलायचं !!
या 'एकतर्फी' वाटणाऱ्या नात्याचं काय करायचं !
एकाने निर्मळतेने सर्व काही सांगायचं !
आपली सुख-दुःख ,problems share करायची !!
आणि दुसऱ्याने नेहमीच त्याची टिंगल उडवायची !!!
एकाने heartच्या 'the most closest' ठेवायचं !
आणि दुसऱ्याने त्याच closeness चा अभाव दाखवायाचा !!
एकाने हक्काने मदतीचा हात सुद्धा मागायाचा !
आणि दुसऱ्याने तो द्यायचा !!
पण तरीही दूर वाटतो स्पर्श त्या हाताचा !!!
या हळव्या मनाचं काय तरी करायचं !
मिळेल त्यात समाधानी तो कधीच नाही व्हायचा !!
बहुतेक त्याला एक गोष्ट नाही कळली -
'गरज फक्त का आपली ?'
'आज रागवू' असं तर ठरवलं !
पण लगेच समजलं !!
खंत आहे मनातली !
गरज आहे आपली !!
त्यात तुझी चुक कसली !!!
तेव्हा...
ठरवलं आज तुझ्यावर रागावायचं !
पण काही नाही बोलून दाखवायचं !!
As usual सर्व काही विसरायचं !
नी परत हसत- खेळत रहायचं !!
नी परत हसत- खेळत रहायचं !!!
(composed before 16 July 08)