Sunday, July 19, 2009

नातं


नातं


नातं हे काय असतं !
नातं हे रक्ताचं असतं !!
आई-मुलांचं प्रेम असतं !!!


नातं हे काय असतं !
नातं हे विचारांचं असतं !!
गुरु-शिष्यांचं बंधन असतं !!!


नातं हे काय असतं !
नातं हे मनाचं असतं !!
दोन जीवांचं मीलन असतं !!!


नातं हे काय असतं !
नातं हे विज्ञान असतं !!

पशु-पक्ष्यांचं जीवन असतं !!!


नातं हे वाळुप्रमाणं असतं !
घेता गच्च मुठीत !!
जाईल निसटुन क्षणात !!!


नातं हे पतंगाप्रमाणं असतं !
असेल ताण जास्त !!
कटन्याची फारच धास्त !!!


नातं हे काय असतं !
नातं हे चूंबक नसतं !!
समविचारांचं अपकर्षण नसतं !!!


नातं हे काय असतं !
प्रेमाचं प्रमाण असतं !!
आयुष्याचं समीकरण असतं !
जगन्याचं कारण असतं !!


नातं हे काय असतं !
नातं हे नातं असतं !!
माझ्यासाठी ते एक प्रश्नचिन्ह (?) असतं !!!




(composed before 19 July 09)

Wednesday, July 1, 2009

Proclamation

Hi,

Here is a proclamation about my poem.

Many of the visitors marveled at it and questioned about its originality .

So I here declare that it has not been plagiarised and I am solely responsible for it.

Thanks

Bye and take care.

माझे मन



माझे मन

मन माझे फूलपाखरू !
फिरे चोहिकडे तुरु-तुरु !!

कधी स्वयंपाकघरातील खमंग वास !
कधी दिवाळीतील दिव्यांची आस !!
तर कधी दसरातील रावणाचा र्हास !
अन कधी भविष्यातील स्वप्नांचा ध्यास !!

मन आज U.S. ला
उद्या लंडनला !
तर कधी ' गोली मारे
रवीना टंडनला ' !!

आनंदी नाचे मज मन धरुनी जोर !
जसा वसंती नाचतो थुई थुई मोर !!

मन रंगवी प्रेमाची मधुर स्वप्नं !
कधी पाहिलेला चेहरा रेखाटनं !!

आहे माझे मन फारच हळवे !
जसे टिकली मारुनी पळवून न्यावे !!

असे हे मन माझे अजूनही तरुण !
करी पृथ्वी प्रदक्षना मिनिटात पूर्ण !!

नाही माझ्या मनी एकही खंत !
आहे विशाल हा अनंत !
म्हणुनी नाही स्वैराचाराला अंत !!

मन माझे फूल पाखरू !
फिरे चोहिकडे तुरु-तुरु !!

(composed before 30 July 08)